जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मिळते डेंग्यूला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:42 IST2019-09-20T01:42:23+5:302019-09-20T01:42:41+5:30

ज्या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात त्याच ठिकाणी रुग्णांना रोग जडण्याची शक्यता निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाजवळ कचºयाचे साम्राज्य बघायला मिळत असून, रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ रिकामे टायर, भंगार कचरापेट्या तसेच फाटलेले कपडे पडलेले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी डेंग्यूच्या डासांना आयते आमंत्रण मिळत आहे.

Dengue receives invitation to district hospital premises | जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मिळते डेंग्यूला आमंत्रण

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मिळते डेंग्यूला आमंत्रण

ठळक मुद्देकचऱ्याचे साम्राज्य : रिकामे टायर्स, कचरापेटीत साचले पावसाचे पाणी; डासांचा उपद्रव

नाशिक : ज्या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात त्याच ठिकाणी रुग्णांना रोग जडण्याची शक्यता निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाजवळ कचºयाचे साम्राज्य बघायला मिळत
असून, रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ रिकामे टायर, भंगार कचरापेट्या तसेच फाटलेले
कपडे पडलेले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी डेंग्यूच्या डासांना आयते आमंत्रण मिळत आहे. त्यातच या भागातील काही दिवसांपूर्वी काढलेल्या अतिक्रमणाचे भंगार साहित्यही याठिकाणी पडलेले आढळून येत आहे. तसेच आवारात पावसाच्या पाण्याचे डबके
साचत असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील मोठ्या प्रमाणावर रुग्ण आपल्या उपचारासाठी येत असतात. मोफत उपचार मिळण्याच्या दृष्टीने याठिकाणी रोज हजारो रुग्ण तपासणीसाठी येत असतात. अशात याठिकाणी प्रशासनाकडून त्यांना चांगले उपचार मिळणे अपेक्षित आहेतच मात्र रुग्णालयाच्या आवारात स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
रुग्णालयामध्ये नागरिकांसाठी डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूसारख्या आजारांसाठी जनजागृतीपर
पोस्टर लावण्यात आले आहे.
मात्र रुग्णालयातील आवारातच स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.
काही दिवसांपूर्वी संरक्षण भिंतीजवळ असलेल्या चहाच्या टपºया, दुकाने हटविण्यात आली होती. मात्र त्यातील भंगार
साहित्य अजूनही आवारात पडून आहे.
यामध्ये रिकामे टायर, कचरा, फाटलेले कपडे कित्येक दिवसांपासून तसेच पडून आहे. मात्र अद्यापही याठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न प्रलंबित दिसत आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाºया रुग्णांना प्रवेशद्वाराजवळच असे चित्र दिसत असल्यामुळे ते रुग्णालयाच्या कारभारावर प्र्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

Web Title: Dengue receives invitation to district hospital premises