शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा जोर ओसरला

By admin | Updated: November 17, 2016 00:35 IST

थंडीत वाढ : धोकादायक शहरातून नाशिक बाहेर

नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने डेंग्यूचाही जोर ओसरत चालला असून शासनाने डेंग्यूबाबत जाहीर केलेल्या धोकादायक शहरांच्या यादीतून नाशिक बाहेर पडले आहे. आता राज्यातील मुंबई आणि पुणे या दोनच शहरांमध्ये डेंग्यूचा प्रभाव अजूनही कायम असल्याचे सांगितले जात आहे.गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नाशिककरांना डेंग्यूच्या आजाराने पछाडले आहे. यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. प्रामुख्याने जून ते आॅक्टोबर या कालावधीत रुग्णसंख्या जास्त होती. नाशिकसह राज्यभरात डेंग्यूने थैमान घातल्याने शासनाच्या आरोग्य विभागाने त्याची गंभीर दखल घेत विशेष कृती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. डेंग्यूच्या आजारामुळे धोकादायक शहरांच्या यादीत नाशिकचाही समावेश होता. महापालिकेनेही वारंवार मोहिमा राबवून डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्याचे काम केले, परंतु डेंग्यूच्या आजाराची रुग्ण संख्या काही केल्या कमी होत नव्हती. महापालिकेने त्यासाठी पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारालाही जबाबदार ठरवत काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, महापालिकेकडून प्रयत्न सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही घट होताना दिसून येत आहे. नाशिकमध्ये यावर्षी १ जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत २१६४ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यापैकी ८०९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. या महिन्यात दि. १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत १३४ संशयित रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ३४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)