विनयनगरला डेंग्यूने बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:53 IST2018-10-13T00:52:41+5:302018-10-13T00:53:42+5:30
विनयनगर व साईनगर परिसरात डेंग्यूने थैमान घातले असून, साडेचार वर्षांच्या बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने शहरातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विनयनगरला डेंग्यूने बालिकेचा मृत्यू
इंदिरानगर : विनयनगर व साईनगर परिसरात डेंग्यूने थैमान घातले असून, साडेचार वर्षांच्या बालिकेचा डेंग्यूमुळेमृत्यू झाल्याने शहरातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विनयनगर येथे राहणारी साडेचार वर्षीय बालिका अनुश्री अनुप धामणे हिला दोन दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाल्याने तिच्यावर उपचार केले जात होते; परंतु अखेर उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली. गेल्या काही महिन्यांपासून विनयनगर, साईनाथनगर परिसरात डेंग्यूसदृश आजारांनी थैमान घातले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे रोगराई वाढत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.