एनडीएसटी बचाव कृती समितीतर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 01:10 IST2020-07-09T01:10:03+5:302020-07-09T01:10:27+5:30
एनडीएसटी सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करावे, या मागणीसाठी एनडीएसटी बचाव कृती समिती तसेच मुख्याध्यापक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करताना एनडीएसटी बचाव कृती समितीचे कार्यकर्ते.
नाशिक : एनडीएसटी सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करावे, या मागणीसाठी एनडीएसटी बचाव कृती समिती तसेच मुख्याध्यापक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे जिल्ह्यात बारा हजार सभासद आहेत. पतसंस्थेत करोडो रु पयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्षांना अटक झाली असून, कर्मचाऱ्यांना दिलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या तीन वर्षांच्या फरकाच्या रकमेचा सर्व संचालकांनी सामूहिकरीत्या गैरकारभार केला आहे. त्याची चौकशी सुरू असून, याबाबत संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेच्या संपूर्ण आर्थिक कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर दशरथ जारस, के. के. अहिरे, आर. डी. निकम, पुरु षोत्तम रकिबे, रोहित गांगुर्डे, साहेबराव कुटे, बाळासाहेब सोनवणे, श्याम पाटील, संग्राम करंजकर, दिनेश अहिरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.