डाव्या आघाडीची शहरात निदर्शने

By Admin | Updated: September 4, 2014 00:52 IST2014-09-04T00:49:47+5:302014-09-04T00:52:00+5:30

डाव्या आघाडीची शहरात निदर्शने

Demonstrations in the Left Front city | डाव्या आघाडीची शहरात निदर्शने

डाव्या आघाडीची शहरात निदर्शने


नाशिक : पुणे येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी डाव्या आणि लोकशाही आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (से), भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यामुळे हल्लेखोरांना उन्माद आला असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद बाळगून आहे, परंतु लोकशाही मूल्याचा मान राखला जात आहे. शासनाने हल्लेखोरांचा तातडीने तपास करून त्यांना कडक समज द्यावी व गजाआड करावे, अशी मागणी करून पुणे येथील माकप कार्यालयावरील हल्ल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे, राजू देसले, मनीष बस्ते, एकनाथ येवले, डॉ. संजय जाधव, केरू पाटील हगवणे, महेंद्र दातरंगे, तानाजी जायभावे, सचिन भोर, दत्ता निकम, किसन गुजर आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Demonstrations in the Left Front city