शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

ईपीएफ पेन्शनर्सची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 01:30 IST

‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ ‘हमारी मांगे पुरी करो’ अशा जोरदार घोषणा देत आणि केंद्र सरकारचा निषेध करीत भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले आणि विविध मागण्यांचे निवेदन पीएफ आयुक्तांना देण्यात आले.

ठळक मुद्देआयुक्तांना निवेदन : केंद्र सरकारचा निषेध; जोरदार घोषणाबाजी

सातपूर : ‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ ‘हमारी मांगे पुरी करो’ अशा जोरदार घोषणा देत आणि केंद्र सरकारचा निषेध करीत भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले आणि विविध मागण्यांचे निवेदन पीएफ आयुक्तांना देण्यात आले.नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने पीएफ कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. केंद्रीय बजेटमध्ये ईपीएस९५ पेन्शन वाढीसाठी आर्थिक तरतूद केली नाही. गेली सहा वर्ष सरकार फक्तआश्वासन देत आहे. मात्र निर्णय घेत नाही. म्हणून बजेटचा जाहीर निषेध करण्यात आला. ईपीएस ९५ ची पेन्शन योजना सुरू होऊन २५ वर्ष पूर्ण झाली. दर १० वर्षांनी आढावा घेतला जाणार होता. मात्र आजपर्यंत आढावा अथवा सुधारणा झाली नाही. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी १०० दिवसांत ३ हजार रुपये किमान पेन्शन महागाईभत्त्यासह लागू करण्याचे आश्वासन दिले होते ते पाळले नाही. २०११ मध्ये राज्यसभेत ईपीएस ९५ पेन्शनसाठी भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली होती. कमिटीने शिफारस केल्यानुसार किमान तीन हजार रुपये पेन्शन महागाईभत्तासह लागू करा. वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्या. यावेळी राजू देसले, सुधाकर गुजराथी, डी. बी. जोशी, सुभाष काकड, विलास विसपुते, सुभाष काकुस्ते, सी. डी. ठाकरे, सुभाष शेळके, कृष्णा शिरसाठ, निवृत्ती शिंदे, विठ्ठल सोनवणे, आदींसह जिल्ह्यातील औद्योगिक कामगार, साखर, वीज, एचएएल, विकास सोसायटी, मायको कामगार, विडी कामगार आदी उपस्थित होते.निर्णयाची अंमलबजावणी करावीदेशात ७० लाख पेन्शनधारक आहेत. सुप्रीम कोर्टाने २००६ मध्ये प्रत्येक पेन्शनधारकाला जगण्यासाठी किमान सहा हजार रुपये पेन्शन महागाईभत्तासह मिळावी, असा धोरणात्मक निर्णय दिला होता. त्याची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचे निवेदन पीएफ आयुक्तांना फेडरेशनच्या वतीने देण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकEmployeeकर्मचारीPensionनिवृत्ती वेतन