येवल्यात जनआशीर्वाद यात्रेत भाजपतील गटबाजीचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST2021-08-28T04:18:09+5:302021-08-28T04:18:09+5:30
डॉ. पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला शहरातील विंचूर चौफुलीवरून सुरुवात झाली. डॉ. पवार अश्वरथात बसलेल्या असतांना यात्रा नेण्याच्या मार्गावरून भाजपच्याच ...

येवल्यात जनआशीर्वाद यात्रेत भाजपतील गटबाजीचे प्रदर्शन
डॉ. पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला शहरातील विंचूर चौफुलीवरून सुरुवात झाली. डॉ. पवार अश्वरथात बसलेल्या असतांना यात्रा नेण्याच्या मार्गावरून भाजपच्याच दोन गटांत वाद सुरू झाला. रथाच्या अश्वांचे लगाम खेचाखेची, लोटालाटी सुरू झाली. शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला अन् यात्रा नियोजित मार्गावरून मार्गस्थ झाली. विंचूर चौफुली ते इंद्रनील कॉर्नर रस्ता छोटा व खराब असल्याने सप्तश्रृंगी मंदिराकडून यात्रा न्यावी, असे आपण म्हणत होतो; मात्र काहींनी न ऐकता दुसरा मार्ग निवडला, असे नगरसेवक प्रमोद सस्कर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले तर पोलीस परवानगीनुसार दिलेल्या मार्गावरून यात्रा नेत असताना सस्कर यांना मार्ग माहीत नसल्याने व ते सांगत असलेला रस्ता खराब असल्याचे समजावून सांगितल्यावर ठरल्याप्रमाणे यात्रा झाली. कोणताही वाद झालेला नाही, असा खुलासा जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे यांनी केला आहे.
येवला शहरासह तालुक्यातील भाजपांतर्गत असणारी गटबाजी नेहमीच चर्चेत असते. मात्र, जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्र्यांच्या समोर झालेले गटबाजीचे उघड प्रदर्शन चर्चेचा विषय ठरला आहे.
- २७ बीजेपी येवला
270821\27nsk_15_27082021_13.jpg
- २७ बीजेपी येवला