लोकशाही बळकटीसाठी आयुक्त-महापौर एकत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:49 AM2019-01-19T00:49:19+5:302019-01-19T00:49:40+5:30

गेल्या वर्षभरात आयुक्तविरुद्ध महापौर तसेच लोकप्रतिनिधी असणारे चित्र आता महापालिकेत बदलले असून, शुक्रवारी (दि.१८) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महापौर रंजना भानसी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लोकशाही बळकटीकरणासाठी एकत्रित काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. इतकेच नव्हे तर मतदार जागृती ही केवळ प्रशासकीय पातळीवर राबविण्यात येत असे. मात्र आता मात्र प्रशासनाला नगरसेवकांची साथ मिळणार असून, संपर्क कार्यालयातदेखील मतदारांच्या मदतीसाठी सोय करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी महापौरांनी दिली.

Democracy-strengthening mayor-Mayor together! | लोकशाही बळकटीसाठी आयुक्त-महापौर एकत्र !

लोकशाही बळकटीसाठी आयुक्त-महापौर एकत्र !

Next
ठळक मुद्देमिले सुर मेरा तुम्हारा...: मतदारांसाठी नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयातही सुविधा

नाशिक : गेल्या वर्षभरात आयुक्तविरुद्धमहापौर तसेच लोकप्रतिनिधी असणारे चित्र आता महापालिकेत बदलले असून, शुक्रवारी (दि.१८) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महापौर रंजना भानसी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लोकशाही बळकटीकरणासाठी एकत्रित काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. इतकेच नव्हे तर मतदार जागृती ही केवळ प्रशासकीय पातळीवर राबविण्यात येत असे. मात्र आता मात्र प्रशासनाला नगरसेवकांची साथ मिळणार असून, संपर्क कार्यालयातदेखील मतदारांच्या मदतीसाठी सोय करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी महापौरांनी दिली.
महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर रंजना भानसी इतकेच नव्हे तर बहुतांशी नगरसेवक असा संघर्ष सुरू होता. एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंडे असल्याने मुंढे आणि भानसी हे महासभेच्या दिवशी पीठासनावर आणि काही सार्वजनिक कार्यक्रम वगळता एकत्रित कधीच दिसले नाहीत. राधाकृष्ण गमे आल्यानंतर मात्र वातावरण बदलल्याची प्रचिती शुक्रवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत दिसली. राज्य निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान वाढावे आणि मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी महापालिकेला जनजागृतीचे आवाहन केले असून, त्या पार्श्वभूमीवर गमे आणि भानसी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मतदारांनी आपली नावे अचूक आहेत याची खात्री करून घ्यावी त्याचप्रमाणे नवमतदारांनी तातडीने नावे नोंदवून घ्यावी मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर त्याबाबत नोंदणी करता येईल, असे सांगतानाच आयुक्त गमे यांनी महापालिकेच्या वतीने लोकशाही पंधरवडा जागृतीसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले, तर महापौर रंजना भानसी यांनी मतदार जागृतीसाठी नगरसेवकांनी सक्रिय सहभागी व्हावे तसेच आपल्या संपर्क कार्यालयात मतदारांसाठी अर्ज ठेवावे आणि त्यांना नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी आयुक्त-महापौर एकत्रित आल्याचे वेगळे चित्र अनुभवायला आले.
‘टक्केवारी’ वाढणार?
महापालिकेत टक्केवारी नेहमीच चर्चेत असते. मात्र मतदानाची टक्केवारी वाढावी या विषयावर महापालिकेत चर्चा झाली. सुटीचा दिवस किंवा अन्य कारणांनी मतदानाला जाणे कोणीही टाळू नये यासाठी बचत गटांची मदत घेतली जाणार असून, झोपडपट्टी भागात प्रबोधनासाठी एनजीओंची मदत घेतली जाणार आहे. महापालिकेच्या घंटागाड्यांवरदेखील जागृती करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र आल्याने टक्केवारी वाढेल काय हे मात्र निवडणुकीतच स्पष्ट होईल.

Web Title: Democracy-strengthening mayor-Mayor together!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.