झेब्रा क्रोसिंग पट्टे मारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 01:19 IST2020-10-30T00:01:29+5:302020-10-30T01:19:06+5:30

इंदिरानगर : येथील गजानन महाराज मार्गावरील चौकामध्ये वाढते अपघात लक्षात घेता तातडीने झेब्रा क्रोसिंग पट्टे मारण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे

Demand for zebra crossing stripes | झेब्रा क्रोसिंग पट्टे मारण्याची मागणी

झेब्रा क्रोसिंग पट्टे मारण्याची मागणी

ठळक मुद्देचार्वाक चौकात वाहनांना नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही

इंदिरानगर : येथील गजानन महाराज मार्गावरील चौकामध्ये वाढते अपघात लक्षात घेता तातडीने झेब्रा क्रोसिंग पट्टे मारण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे
इंदिरानगर मधील गजानन महाराज मार्ग हा हा सर्वात जुना व मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यालगत महारुद्र कॉलनी अरुणोदय सोसायटी जिल्हा परिषद कॉलनी देवदत्त सोसायटी मानस कॉलनी सिद्धिविनायक सोसायटी मोदकेश्वर कॉलनी शास्त्रीनगर कमोद नगर सह विविध अपार्टमेंट व सोसायटी आहेत त्यामुळे आणि शहरात येजा करण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून ओळख असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते परंतु गजानन महाराज मंदिरा समोर, मोदकेश्वर चौक, चार्वाक चौक या चौकात वाहनांना नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडतात तसेच हमरीतुमरी होऊन हाणामारीच्या घटनाही घडतात त्याची दखल घेत तातडीने सदर चौकात झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्यात यावे अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे
चौकट : या चौकात सुद्धा मारावे झेब्रा क्रॉसिंग पट्टे सावरकर चौक, बापू बंगला, राजे छत्रपती चौक, पिंगळे चौक, भगवती चौक, श्रीराम चौक, सह परिसरातील चौकांना

 

Web Title: Demand for zebra crossing stripes