करवाढ मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:49 IST2018-03-06T00:49:44+5:302018-03-06T00:49:44+5:30

Demand for withdrawal of tax | करवाढ मागे घेण्याची मागणी

करवाढ मागे घेण्याची मागणी

नाशिकरोड : मनपाने घरपट्टीमध्ये करवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपाने घरपट्टीमध्ये जी करवाढ सुचवली आहे ती अत्यंत अन्यायकारक आहे. महापालिकेकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत जिवंत असताना घरपट्टीाध्ये करवाढ करून नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. महागाई व मंदीमुळे व्यापारी, सर्वसामान्य त्रस्त झाले असताना त्यामुळे मनपाने घरपट्टी करवाढ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनांवर हिरामण तेलोरे, प्रकाश चौधरी, भास्कर करवर, प्रदीप बिन्नर, राजभूषण बागुल, दिलीप बागुल, अमर थटकर, मारुती चकोर, संदीप साळुंखे, प्रकाश काबंळे, मोहन बागुल आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Demand for withdrawal of tax