निवडणुकीचा मेहताना देण्याची मागणी
By Admin | Updated: May 9, 2015 23:15 IST2015-05-09T23:13:00+5:302015-05-09T23:15:03+5:30
निवडणुकीचा मेहताना देण्याची मागणी

निवडणुकीचा मेहताना देण्याची मागणी
येवला : येवला मर्चण्ट को-आॅप. बँक निवडणूक झाल्यानंतर त्या कामाचा कर्मचारी मेहनताना अद्याप मिळाला नसल्याची तक्रार कास्ट्राईब माध्यमिक, उच्च माध्यमिक कर्मचारी कल्याण महासंघाने शिक्षण आमदार अपूर्व हिरे यांच्याकडे केली आहे.
येवला येथील जनता विद्यालयात येवला मर्चण्ट को-आॅप. बँकेची निवडणूक प्रक्रिया संपून महिना उलटला. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी तथा सहा. निबंधक अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांकडून तोंडी आदेशाने कामे करून घेतली मात्र त्यांना त्या कामाचा मोबदला दिला नाही. याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी
मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शालेय कामकाज आटोपल्यानंतर जनता विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रक्रियेसाठी शाळेच्या वर्ग खोल्या स्वच्छ करून २२ हॉल उपलब्ध करून दिले. मतदानाच्या दिवशी त्यांच्याकडून दिवसभर कामकाज करून घेतले. मात्र यानंतर मेहनताना देण्यास टाळाटाळ करत आहेत.
येथील कार्यालयातील लोकांनीदेखील याबाबत तक्र ारी तोंडी स्वरूपात केल्या आहेत. याबाबत योग्य ती चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर कास्ट्राईब माध्यमिक, उच्च माध्यमिक कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब पटाईत, एकनाथ मोरे, उदय लोखंडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहे. (वार्ताहर)