शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

गिरणा नदीला पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 5:00 PM

पाणीटंचाई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन

ठळक मुद्दे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ

खर्डे : देवळा तालुक्यातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता गिरणा नदीला तात्कळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे, देवळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. गिरणा नदीला पाणी नसल्याने नदीच्या परिसराबरोबरच गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना पूर्णत: ठप्प आल्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. देवळा तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता गिरणा नदीला तात्काळ पाणी सोडणे आवश्यक असून गिरणा नदीला दोन दिवसात पाणी न सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, प्रांतिक सदस्य योगेश आबा आहेर , राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा उषाताई बच्छाव, शहराध्यक्ष जितेंद्र आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निखिल आहेर, तालुकाध्यक्ष सुनील आहेर, कृष्णा अहिरे, राजेश आहेर, सचिन सूर्यवंशी, अनिल पवार, यज्ञेश रौंदळ आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी