भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 18:17 IST2018-11-27T18:16:43+5:302018-11-27T18:17:14+5:30

सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने ग्रामस्थांना भटक्या कुत्रे धुमाकूळ घालत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Demand for wandering dogs | भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने ग्रामस्थांना भटक्या कुत्रे धुमाकूळ घालत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गावात अगोदरच भटक्या कुत्रे धुमाकूळ घालत असून त्यात भर म्हणून काही अज्ञातांनी बाहेरच्या कुत्र्यांना गावात आणून सोडल्याने ही कुत्री एकमेकांवर भुंकतात व हल्ला करत असतात. यातील काही कुत्रे पिसाळलेले असल्याने त्यांनी गावातील दोन व्यक्तींना चावा घेतला असून त्यांच्या चाव्याने इतरही कुत्री पिसाळू शकतात. तरी सबंधितांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना सुरक्षितता द्यावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Demand for wandering dogs