अनकाई येथे लसीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:20 IST2021-05-22T20:18:10+5:302021-05-23T00:20:19+5:30

येवला : तालुक्यातील अनकाई व परिसरात वाढती कोरोना बाधित रुग्णसंख्या पाहता अनकाई येथे आरोग्य विभागाने लसीकरणासह कोरोना चाचणी शिबिर घेण्याची मागणी माजी सरपंच डॉ. सुधीर जाधव यांनी एका निवेदनाद्वारे संबंधितांकडे केली आहे.

Demand for vaccination at Ankai | अनकाई येथे लसीकरणाची मागणी

अनकाई येथे लसीकरणाची मागणी

ठळक मुद्देअनकाई गावात आत्तापर्यंत शंभराच्यावर रुग्ण

येवला : तालुक्यातील अनकाई व परिसरात वाढती कोरोना बाधित रुग्णसंख्या पाहता अनकाई येथे आरोग्य विभागाने लसीकरणासह कोरोना चाचणी शिबिर घेण्याची मागणी माजी सरपंच डॉ. सुधीर जाधव यांनी एका निवेदनाद्वारे संबंधितांकडे केली आहे.

अनकाई गावात आत्तापर्यंत शंभराच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. तर आठ-दहा बळी गेले आहे. परिसरातील अनकुटे, वसंतनगर, बाळापूर, चांदगाव, कुसुर, कुसमाडी, नायगव्हाण आदी गावांचा संपर्क अनकाईशी येतो. या गावातही अधिक रुग्णसंख्या आढळली होती.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने अनकाई गावात लसीकरणासह कोरोना चाचणी शिबिर घ्यावे, असे सदर निवेदनात डॉ. जाधव यांनी म्हटले आहे. राजापूर आरोग्य केंद्रातही लसीची संख्या वाढवून राजापूर परिसरातील लसीकरण पूर्ण करावे, अशी मागणीही निवेदनाच्या शेवटी केली आहे.

Web Title: Demand for vaccination at Ankai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.