सजेसाठी तलाठी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:16 IST2020-07-26T22:06:28+5:302020-07-27T00:16:55+5:30
खडकी : तालुक्यात नवीन सजा निर्माण झाल्या असल्या तरी तलाठी मात्र अतिरिक्त असल्याने कामाच्या भाराने कर्ज प्रकरणे थांबली असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रत्येक सजेला स्वतंत्र तलाठी लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सजेसाठी तलाठी देण्याची मागणी
खडकी : तालुक्यात नवीन सजा निर्माण झाल्या असल्या तरी तलाठी मात्र अतिरिक्त असल्याने कामाच्या भाराने कर्ज प्रकरणे थांबली असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रत्येक सजेला स्वतंत्र तलाठी लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कामाचा भार शेतकऱ्यांची सुविधा यासाठी तालुक्यात १६ ते१८ नवीन सजा निर्माण करण्यात आल्या. जूनमध्ये शेतकºयांना खरीप पिककर्जाची गरज भासते. सदर कर्ज शेतीवर मिळते. शेतीची सर्व कागदपत्रे हे तलाठी यांचे कार्यालयात उपलब्ध करून दिली जातात. मात्र तलाठी त्यांच्या मुख्यालयात उपलब्ध आहेत. सदर कार्यालय १० ते १५ किलोमिटर अंतरावर असलेल्याने हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतीची कामे थांबली आहेत. ७/१२ उतारा, ड पत्रक नोंदी, बोजा निर्माण, उतरविणे आदी कामे रखडली आहेत. त्यामुळे तलाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.