पेठ ते दाभाडी बस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:38 IST2020-08-05T23:03:11+5:302020-08-06T01:38:22+5:30
पेठ : तालुक्यात कोरोनाचे संकट काहीअंशी दूर झाले असून, शासनाने जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अनलॉक-३ अंतर्गत ग्रीन झोन भागात बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. पेठ ते दाभाडी ही बस सुरू करावी, अशी मागणी पेठ तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

पेठ आगारप्रमुख स्वप्निल आहिरे यांना निवेदन देताना विशाल जाधव, याकूब शेख, संदीप भोये, राहुल चौधरी, विकास सातपुते, भागवत जाधव आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : तालुक्यात कोरोनाचे संकट काहीअंशी दूर झाले असून, शासनाने जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अनलॉक-३ अंतर्गत ग्रीन झोन भागात बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. पेठ ते दाभाडी ही बस सुरू करावी, अशी मागणी पेठ तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
तहसीलदार संदीप भोसले व आगारप्रमुख स्वप्निल आहिरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पेठ हा दुर्गम तालुका असल्याने दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा नसल्याने खंबाळे, जुनोठी, हातरुंडी, दाभाडी, सादडपाडा, उंबरपाडा परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पेठ ते दाभाडी बस सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल जाधव, युवक कॉँग्रेस अध्यक्ष याकूब शेख, संदीप भोये, राहुल चौधरी, विकास सातपुते, भागवत जाधव यांच्यासह युवक कॉँग्रेसचे सभासद उपस्थित होते.