पालखेड आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:51 IST2021-03-24T22:20:03+5:302021-03-25T00:51:11+5:30

मानोरी : येवला तालुक्यात महिनाभरापासून उष्णतेचा पारा वाढला असून ग्रामीण भागातील शेतशिवारातील विहिरींतील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात झाल्याने पाण्याची कमतरता भासू नये याकरीता पालखेड आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी केला जात आह

Demand for release of water from Palakhed cycle | पालखेड आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी

पालखेड आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी

ठळक मुद्देपाण्या अभावी उन्हाळ कांदे सोडून देण्याची वेळ

मानोरी : येवला तालुक्यात महिनाभरापासून उष्णतेचा पारा वाढला असून ग्रामीण भागातील शेतशिवारातील विहिरींतील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात झाल्याने पाण्याची कमतरता भासू नये याकरीता पालखेड आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी केला जात आहे.

उन्हाळ कांद्याला देण्यासाठी विहिरींना पाणी नसल्याने पाण्या अभावी उन्हाळ कांदे सोडून देण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. उन्हाळ कांद्याना अद्यापही तीन ते चार मुबलक पाण्यांची गरज असून येवला तालुक्यात पालखेड कालव्यातून आवर्तन सुरु आहे.
              या आवर्तनामधून येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड येथील गोई नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून वितरिका क्रमांक २१ , २५ आणि २८ देखील पालखेड आवर्तनातून पाणी तात्काळ सोडण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

Web Title: Demand for release of water from Palakhed cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.