Demand for purchase of oxygen constructor from corporator fund | नगरसेवक निधीतून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदीची मागणी

नगरसेवक निधीतून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदीची मागणी

नगरसेवक निधीतून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदीची मागणी

रुची कुंभारकर यांचे मनपा आयुक्तांना पत्र

पंचवटी : राज्यात कोरोना रुग्ण वाढत चालल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. कोरोना लक्षणे कमी असलेले अनेक रुग्ण सध्या आयसोलेशन किंवा मनपाच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत मात्र सर्व ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नगरसेवक निधीतून प्रभाग क्रमांक तीन मधील रुग्णांसाठी दहा ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदीसाठी लागणारा निधी 2021-22

आर्थिक वर्षातील निधीतील खर्च करावा अशी मागणी नगरसेवक रुची कुंभारकर यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

कोरोना रुग्णांना ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे तर दुसरीकडे रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिक स्थिती बिघडत चालले आहे प्रभाग क्रमांक 3 मध्ये देखील कोरोना रुग्ण असून त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने नगरसेवक निधी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदीसाठी वापरावा अशी मागणी केली आहे. कुंभारकर यांनी दोन दिवसांपूर्वी याबाबत मनपा आयुक्त कैलास जाधव यांना पत्र सादर केले आहे.

Web Title: Demand for purchase of oxygen constructor from corporator fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.