नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:34 IST2020-04-29T21:05:30+5:302020-04-29T23:34:33+5:30
लासलगाव : नाफेडच्या माध्यमातून जास्तीत जास्त कांदा खरेदी करण्यात यावा अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याची मागणी
लासलगाव : नाफेडच्या माध्यमातून जास्तीत जास्त कांदा खरेदी करण्यात यावा अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघ हा कृषीप्रधान मतदारसंघ असून येथील शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर उत्कृष्ट दर्जाच्या कांद्याचे उत्पादन घेतो. तर उत्कृष्ट दर्जाचा कांदा हा परदेशामध्ये निर्यात केला जातो. तो उत्पादित कांदा विक्र ीसाठी बाजार समित्यांमध्ये आणला जातो. सध्या कोरोना विषाणूच्या संक्र मणामुळे भारतातील सर्वच राज्यांत लॉकडाऊन केले आहे. मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन विक्र ीसाठी तयार असताना कांद्याचे दर देखील घसरले आहेत. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसाने देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतक-यांचे हित लक्षात घेता केंद्रीय कृषी मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाद्वारे (नाफेड) जास्तीत जास्त कांदा योग्य किमतीत खरेदी करून कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा द्यावा याकरिता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर व राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) यांचेकडे खासदार पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.