चाळीतील सडलेल्या कांद्याचे पंचनामे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:23 IST2019-01-11T18:23:29+5:302019-01-11T18:23:46+5:30
मागील वर्षाचा साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा हा चाळीतच सडला असून त्याला मोड आले आहे. कांदा हा आता सध्या पन्नास ते शंभर रु पये क्विंटल जात असल्याने झालेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. शासनाने चाळीतील कांद्याचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आहे.

चाळीतील सडलेल्या कांद्याचे पंचनामे करण्याची मागणी
राजापूर : परिसरातील मागील वर्षाचा साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा हा चाळीतच सडला असून त्याला मोड आले आहे. कांदा हा आता सध्या पन्नास ते शंभर रु पये क्विंटल जात असल्याने झालेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मार्केटला नेण्यासाठी घरातूनच भाडे भरण्याची वेळ आलेली आहे. या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने मागील वर्षी उन्हाळ कांदा आशापोटी शेतकºयांनी साठविला. मात्र कांद्याचे गणित उलटे झाल्याने हा
कांदा चाळीतच सडला आहे.
शासनाने चाळीतील कांद्याचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसान
भरपाई द्यावी अशी मागणी राजापूर
व परिसरातील शेतकºयांनी
केलेली आहे.
जीवाचे रान करून कांदा पिकाचे विक्र मी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकºयांना सध्या कोसळलेल्या कांद्याच्या दराने निराश केले आहे. भाववाढीची आस लागलेल्या शेतकºयांचा कांदा चाळीतच सडायला लागला आहे. त्यामुळे चांगला असलेला कांदा विकण्याशिवाय व खराब कांदा फेकण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकºयांसमोर राहिलेला नाही.