शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामाचे पैसे खात्यावर वर्ग करण्यासाठी पैशाची मागणी

By admin | Updated: September 9, 2015 23:40 IST

आरोप : रायुकाँ तालुका अध्यक्षांची लेखी तक्रार

येवला : रोजगार हमीच्या कामाचे पैसे खात्यावर वर्ग करा, या विखारणीच्या मजुराची कैफियत घेऊन जाणाऱ्या याच गावातील दोन माजी सरपंचासह, राष्ट्रवादीच्या युवक तालुका अध्यक्षाकडेच येवल्याच्या पंचायत समितीमधील उपअभियंत्याने बील देयकावर स्वाक्षरीचे बारा हजार रुपये मागितल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.दरम्यान, येत्या तीन दिवसात मजुरांच्या कामाचे पैसे मिळाले नाही, तर मजुरांसह येवला पंचायतीसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पंचायत समितीला त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. विखरणी ग्रामपंचायतअंतर्गत, विखरणी कानडी शिवरस्ता, गुजरखेडे रस्ता ते अहिरे वस्ती रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून सुरू आहे. चार महिने झाले तरी येवला पंचायत समितीने मजुरांचे व कामाचे बिल अदा केले नाही. विखरणीचे माजी सरपंच यादव अहिरे, यमाजी शेलार यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस तालुका अध्यक्ष मोहन शेलार हे पंचायत समिती उपअभियंता दिलीप धामणे यांच्याकडे गेले असता, मजुरांच्या बिलावर ५ टक्के द्या मग सही करतो, अशी थेट मागणी उपअभियंत्याने केल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. पैसे दिले तर सही करणार अथवा माझ्या सहीची काहीही गरज नाही, अशी सोयीची भाषा उपअभियंता धामणे यांनी चर्चेत वापरली असल्याचे शेलार यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पंचायत समितीमधील ग्रामसेवक या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असून, ग्रामसेवकाच्या बैठकीत या अधिकारीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. हे अधिकारी दिशाभूल करीत असल्याचे ग्रामसेवक संघटनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. (वार्ताहर)

 

''दुष्काळात लोकांना काम नाही. मजुरांनी काम केले तर अधिकारी पैसे घेतल्याशिवाय पैसे देत नाहीत. मजुरांकडून पैशांची अपेक्षा करणे ही येवला पंचायत समितीला लाजिरवाणी गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली असलेल्या येवला पंचायत समितीने विविध कामांच्या बिलासाठी टेबलाखालून घेणार्‍या पैशांचा भावफलक लावावा म्हणजे ग्रामीण भागातील मजुरांना त्याचीही अडचण होणार नाही.- मोहन शेलार,राष्ट्रवादी, युवक तालुका अध्यक्ष, येवला