मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:44 IST2019-01-14T17:43:15+5:302019-01-14T17:44:06+5:30
ममदापूर : ममदापूर येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना २६ जानेवारी पर्यंत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
ममदापूर : ममदापूर येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना २६ जानेवारी पर्यंत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
ममदापूर येथे १५ ते १६ मोकाट गाई आणि वासरे असून दरवर्षीच पिकांची मोठ्या प्रमाणात या जनावरांकडून नासाडी होत आहे. आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी करून देखील याप्रकरणी ग्रामपंचायत कुठल्याही प्रकार कारवाई करत नसल्याने या गोष्टीचा शेतकºयांना त्यांच्या पिकाला मोठा फटका बसत आहे.
ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला सह्या घेऊन तक्र ार अर्ज दिले आहेत. परंतु ग्रामपंचायतने अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई यासंदर्भात केलेली नाही. त्यामुळे प्रामुख्याने पावसाळ्यात मोकाट जनावरे शेतकºयांच्या पिकांची नासाडी करतात. पंधरा ते सतरा जनावरे शेतातून गेली तरी काही खाऊन तर काही पिक तुडवून शेतकºयाचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने यावर्षी परिसरातील सर्वच पाणी साठे, बंधारे रिकामे आहे त्यामुळे या मोकाट जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. चाºयासाठी सध्या हे मोकाट जनावरे शेतकºयाने आणलेल्या चाºयावर ताव मारतात. त्यामुळे जनावरांचा २६ जानेवारी पर्यंत बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. परिसरात कुठेही पाणी शिल्लक नसल्याने सदर मोकाट जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे सदर मोकाट जनावरे पालन करणाºया शेतकºयांना देण्यात यावे किंवा रीतसर लिलाव करावा अशी मागणी होत आहेत.
सध्या काही शेतकºयांनी कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी कांद्याच्या डोंगळ्याची लागवड केली असून दुष्काळामुळे पुढील वर्षी बियाणे मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे काही शेतकºयांनी टँकरद्वारे विकत पाणी घेऊन बियाणे तयार करण्यासाठी पाच ते दहा वाफे डोंगळ्याची लागवड केली आहे. परंतु परिसरात मोकाट जनावरांना गवत नसल्याने या पिकांची नासाडी होऊ शकते. त्यामुळे या मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा.
विजय गुडघे,
शेतकरी, ममदापुर.