चांदवडच्या कोविडसेंटरमध्ये औषधे व यंत्रसाम्रुगी द्यावी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 10:46 PM2021-04-06T22:46:07+5:302021-04-07T01:02:53+5:30

चांदवड - चांदवड तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रुग्णालयामध्ये त्वरीत औषध साठा व यंत्रसाम्रुगी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भारतीय कम्युनिष्ट पक्ष व आखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री , उपविभागीय अधिकारी , तहसीलदार प्रदीप पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Demand for medicines and machinery at Kovid Center, Chandwad | चांदवडच्या कोविडसेंटरमध्ये औषधे व यंत्रसाम्रुगी द्यावी मागणी

चांदवडच्या कोविडसेंटरमध्ये औषधे व यंत्रसाम्रुगी द्यावी मागणी

Next
ठळक मुद्देबाहेरुन औषधे विकत घेण्यास सांगीतले जाते.

चांदवड - चांदवड तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रुग्णालयामध्ये त्वरीत औषध साठा व यंत्रसाम्रुगी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भारतीय कम्युनिष्ट पक्ष व आखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री , उपविभागीय अधिकारी , तहसीलदार प्रदीप पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष अ‍ॅड.दत्तात्रय गांगुर्डे, भास्करराव शिंदे, सुकदेव केदारे, अ‍ॅड.गणेश ठाकरे, अ‍ॅड. पंकज काळे, शंभुराजे खैरे, अ‍ॅड. धनंजय आहेर, अ‍ॅड.दीपक पवार अ‍ॅड.व्ही.व्ही.जाधव,शिरसाठ आदिसह कार्यकर्त्याच्या सह्या आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधीताची संख्या वाढली आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी केली जाते मात्र पॉझिटिव्ह रुग्ण आल्यानंतर त्यांना औषध गोळ्या शिल्लक नाही असे सांगुन बाहेरुन औषधे विकत घेण्यास सांगीतले जाते.

होम कॉरटाईन केलेल्या रुग्णांना सरकारी रुग्णालयातून औषधे उपलब्ध होत नसल्याने बाहेरून महागडी औषधे घ्यावी लागतात. तर अती गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याने त्यांना अ‍ॅडमिट केले जात नाही.चांदवड येथील कोविड सेंटरमध्ये व्हेंटीलेटरची संख्या अपुर्ण आहे. तर एक्सरे , इ.सी.जी.मशीन उपलब्ध नाही. त्यामुळे चांदवड येथील कोविड सेंटरमध्ये अचानक व्हेंटीलेटरची गरज भासली तर रुग्णांना इतरत्र हलवावे लागते.

बेड अपुर्ण आहेत. तर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात पुर्णवेळ एम.डी. एम.बी.बी.एस. व तज्ञ डॉक्टर नाहीत. त्यात अपुरा कर्मचारी वर्ग भुलतज्ञ नाही. तरी चांदवडच्या कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा त्वरीत उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी निवेदनात केली आहे.

Web Title: Demand for medicines and machinery at Kovid Center, Chandwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.