खामखेडयातील टरबुजला परप्रांतात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:22 IST2019-03-30T17:21:30+5:302019-03-30T17:22:12+5:30
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे लाल व उन्हाळी कांदा या बरोबर आता खरबूज व टरबूज पीक उत्पादन घेणारे गाव म्हणून होवू लागली आहे. कारण खामखेडा येथील टरबूज, व खरबूज फळे खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बंधावर येऊन लागला आहे.

खामखेडा परिसरात टरबूज पिकाची तोडणी करतांना.
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे लाल व उन्हाळी कांदा या बरोबर आता खरबूज व टरबूज पीक उत्पादन घेणारे गाव म्हणून होवू लागली आहे. कारण खामखेडा येथील टरबूज, व खरबूज फळे खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बंधावर येऊन लागला आहे.
गेल्या काही वर्षा पासून आवकाळी पाऊस गारपिट आणि बदलते हवामान यामुळे कांदा, डाळीब आदी नगदी पिके धोक्यात सापडली आहेत. या परिसरातील शेतकरी डाळींब पिकांची मोठया प्रमाणात शेती करीत होता. त्याच्यातून त्याला चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जात असे. त्याच्यातूनही शेतकऱ्यांची चागली उलाढाल होत असे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून बेमौसमी आवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा फटका त्यामुळे कांदा पिक धोक्यात आले आहे. चालु वर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन चांगल्यापैकी आले .परंतु सध्या मात्र कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही.
खामखेडा परिसरात उन्हाळी हंगामात मिरची किंवा टमाटे पीक घेतले जात होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कमी पाण्यात आता तरु ण शेतकरी टरबूज व खरबूज या पिकाकडे वळला आहे. उन्हाळ्यात विहिरींना कमी पाणी असते. तेव्हा आता ठिबक सिंचन व सुधारित पध्दतीचा अवलंब करून उन्हाळी हंगामात या वर्षी शेकडो शेतकरी खरबूज व टरबूज पिकाची करीत आहे. याही वर्षी शेकडो शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज पिकाची लागवड केली आहे. तेव्हा आता भरघोस उत्पादन असल्याने परप्रातिय व्यापारी आता शेतकºयाच्या बंधावर टरबूज पिकाची खरेदीसाठी येत आहे.
सद्या टरबूज पिकाला सहा ते सात रु पये प्रति भाव मिळत आहे. एक टरबूज फळांचे वजन दोन ते दहा किलो पर्यत असते. तेव्हा एक टरबुजचे साधारण पंचवीस रु पये ते चाळीस रु पया मिळतात. हे टरबूज जोडण्यासाठी व गाडीत भरण्यासाठी माणसाची आवश्यकता असते. तेव्हा गावातील स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. सद्या उन्हाळताचे दिवस आहे. उन्हाळ्यात टरबूज , खरबूज किंवा काकडी शरीरासाठी फार उपयोगी असते. मार्च महिन्याचे कडक ऊन पडत आहे. बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तेव्हा टरबुजला मोठ्या प्रमाणात मागणी असलंयाने परप्रतिय व्यापारी थेट टरबूज खरेदीसाठी शेतकºयांच्या बंधावर येऊ लागल्यामुळे शेतातच व्यवहार होवू लागल्याने शेतकºयांचे श्रम, वेळ व पैशाची बचत होत आहे.