मुखेड फाट्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:39 IST2019-05-31T18:38:50+5:302019-05-31T18:39:05+5:30
नाशिक-औरंगाबाद राज्यमहामार्गावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली असून, या महामार्गावर गाव तिथे गतिरोधकदेखील बसविण्यात आले असून, त्यात रस्त्याच्या डागडुजी चे काम येवला तालुक्यात प्रगतिपथावर असल्याने नाशिक-येवला महामार्गाला पुन्हा नव्याने झळाळी प्राप्त झाली आहे.

मुखेड फाट्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी
मानोरी : नाशिक-औरंगाबाद राज्यमहामार्गावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली असून, या महामार्गावर गाव तिथे गतिरोधकदेखील बसविण्यात आले असून, त्यात रस्त्याच्या डागडुजी चे काम येवला तालुक्यात प्रगतिपथावर असल्याने नाशिक-येवला महामार्गाला पुन्हा नव्याने झळाळी प्राप्त झाली आहे.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यास मात्र वाहनचालक तयार नसून मनमानी कारभारामुळे भरधाव वेगाने वाहने चालवत असून, तालुक्यातील मुखेड फाटा येथे येवल्याहून नाशिककडे आणि नाशिकहून येवल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अद्यापही गतिरोधक बसविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडला आहे.
यात प्रामुख्याने मुखेडहून मुखेड फाटा येथे आल्यानंतर आणि पाटोदाच्या दिशेने मुखेड फाटा येथे आल्यानंतर येवला ते नाशिक आणि नाशिक ते येवला या दोन्ही बाजूंना गतिरोधक नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. परिणामी गतिरोधक नसल्याने अनेक चारचाकी आणि दोनचाकी वाहने सर्रास वेगाने आपली वाहने चालवित असतात. त्यामुळे अनेकदा वाहने वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात घडले असून, अनेक वाहनचालक जखमी झाले असून, काहींच्या जिवावरदेखील अपघात ओढवला असून, या दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ गतिरोधक बसवावे जेणे करून अपघातांच्या घटनेत कमीपणा येणार असल्याचे मुखेड फाटा येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.