सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:15 IST2020-08-11T23:26:03+5:302020-08-12T00:15:07+5:30
सातपूर : मनपा शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी
ठळक मुद्देपालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : मनपा शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश खांडबहाले, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष राजेश दाभाडे, महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र बागुल आदींसह पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन मनपा शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.