दिंडोरी : तालुक्यात दुष्काळामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून दुष्काळ निवारण योजनांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची मागणी दिंडोरी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन नायब तहसिलदार थविल यांना देण्यात आले.दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार करावयाची मदत आणि लवकरात लवकर सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी दिंडोरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नायब तहसिलदार थविल यांनी निवेदन देण्यात आले. गेल्या चार महिन्यांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतक-यांना सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश करण्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच ठोस उपाययोजना केलेली नाही. दुष्काळ व्यवस्थापन संहितानुसार ज्या उपाययोजना सरकारने करायला हव्यात, त्या अद्याप प्रशासनाने केलेल्या नाहीत, त्यामुळे जनतेच्या मनात रोष निर्माण झालेला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर योजनांची अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण तहसील कार्यालय ताब्यात घेईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले, तालुकाध्यक्ष अमोल उगले, नगरसेवक धनराज भवर, तालुका उपाध्यक्ष रोशन दिवटे, प्रितम गांगोडे, रोशन जाधव, नामदेव गावित, मुजफ्फर शेख, अभिजित सोनवणे, बाळू उदार, अमोल राजगुरु , विलास लाखे, विकी आंबेकर, चैतन्य वेताळ, प्रसाद टर्ले, दर्शन महाले, मयूर लोखंडे, दुर्गेश तासकर, शुभम पिंगळे, गोविंद जोशी, मयूर पगार, चैतन्य गायकवाड, देवेंद्र जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दुष्काळ निवारण योजनांच्या अंमलबजावणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:20 IST
मनसेचे निवेदन : दिंडोरी तालुक्यात चिंताजनक स्थिती
दुष्काळ निवारण योजनांच्या अंमलबजावणीची मागणी
ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतक-यांना सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश करण्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच ठोस उपाययोजना केलेली नाही.