नाशिक- औरंगाबाद रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:12 IST2020-10-01T17:12:10+5:302020-10-01T17:12:33+5:30

निफाड : नाशिक-औरंगाबाद या मार्गावरील पिंपळस (रामाचे) ते विंचूर या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सदरचे खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी निफाडकर ग्रामस्थांनी केली आहे.

Demand for immediate filling of potholes on Nashik-Aurangabad road | नाशिक- औरंगाबाद रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी

नाशिक- औरंगाबाद रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी

ठळक मुद्दे२२ किमी अंतराच्या दरम्यान या रस्त्यात प्रचंड खड्डे

निफाड : नाशिक-औरंगाबाद या मार्गावरील पिंपळस (रामाचे) ते विंचूर या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सदरचे खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी निफाडकर ग्रामस्थांनी केली आहे.
नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर प्रचंड वाहतूक चालत असते. या रस्त्यावरील पिंपळस (रामाचे) ते विंचूर या २२ किमी अंतराच्या दरम्यान या रस्त्यात प्रचंड खड्डे पडले असून वाहनधारकांना येथून कसरत करत जावे लागते. या रस्त्यावरून वाहने चालवतांना जीव मुठीत धरून चालवावी लागतात शिवाय या रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असून वाहन चालवणे अत्यंत धोकादायक ठरत आहे.
या खड्यातून वाहन जातांना वाहने आपटल्याने वाहनधारकांना वाहने चालवणे अवघड होऊन बसले आहे. या खड्यांमुळे वाहनांची सुद्धा वाट लागली असून वाहने वारंवार दुरु स्त करावी लागतात. सदरचे खड्डे बुजवण्याची मोहीम मागे हाती घेण्यात आली होती, मात्र ही तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. हे काम अर्धवट झालेले असून उर्वरित सर्व खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी निफाडकर ग्रामस्थांनी केली आहे. 

Web Title: Demand for immediate filling of potholes on Nashik-Aurangabad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.