रखडलेले अनुदान वर्ग करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:06 IST2019-06-18T23:26:46+5:302019-06-19T01:06:23+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गत चार वर्षांपासून रखडलेले पीव्हीसी पाइप आणि तेलपंप योजनेचे अनुदान त्वरित आदिवासी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.

रखडलेले अनुदान वर्ग करण्याची मागणी
नाशिक : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गत चार वर्षांपासून रखडलेले पीव्हीसी पाइप आणि तेलपंप योजनेचे अनुदान त्वरित आदिवासी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली. विवेक पंडित यांना नवनाथ खादे, गोरख मदगे आणि अन्य शेतकºयांनी दिलेल्या निवेदनात आठ हजार तीनशे पंधरा आदिवासी शेतकºयांचे एकूण १६ कोटी ४६ लाख रुपयांचे अनुदान थकवण्यात आले असल्याचे म्हटले आहे. हे अनुदान त्वरित वर्ग न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी भंडारदरावाडी येथील देवराम फोडसे, बबन सांबरे, शंकर वाखेरे, विठ्ठल दरेकर, तुकाराम जाधव, किसन गोडे, संपत गोडे आदी उपस्थित होते.