शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
2
वादग्रस्त निर्णय! RCB चा फलंदाज बाद होता, गावस्करांसह अनेकांचा दावा; अम्पायरने दिले नाबाद
3
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
4
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
5
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
6
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
7
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
8
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
9
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
10
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
11
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
12
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
13
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
14
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
15
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
16
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
17
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
18
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
19
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
20
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

संगमनेर नाका - मुसळगाव फाटा रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 11:38 PM

सिन्नर : शहरातून जाणाऱ्या संगमनेर नाका ते मुसळगाव फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणासह तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देनिवेदन : माणिकराव कोकाटे यांचे नितीन गडकरी यांना साकडे

सिन्नर : शहरातून जाणाऱ्या संगमनेर नाका ते मुसळगाव फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणासह तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.कोकाटे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. सिन्नर-शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, मंजुरीप्रमाणे नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर बायपास गुरेवाडीपासून पूर्वी अस्तित्वात असलेल्या सिन्नर-शिर्डी महामार्गाला मुसळगाव एमआयडीसी येथे जोडला आहे. परंतु संगमनेर नाका ते मुसळगाव एमआयडीसीपर्यंत चार किमी अंतर हे नवीन मंजुरीमध्ये वगळण्यात आले असून, गुरेवाडी ते मुसळगाव एमआयडीसी या नवीन रस्त्याचा समावेश त्यात केला आहे.त्यामुळे सातत्याने वर्दळ असलेल्या संगमनेर नाका ते मुसळगाव औद्योगिक वसाहत हा चार किमी रस्ता चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. या चौपदरीकरणाच्या कामासाठी प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात संबंधित विभागास आदेश देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, मतदारसंघातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ११ रस्त्यांच्या कामांसाठी आमदार कोकाटे यांनी तब्बल १२० कोटींच्या निधीची मागणी गडकरी यांच्याकडे केली आहे. नागपूरला बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.नाशिक येथील उद्योजक, व्यापारी, सामान्य नागरिकांना महत्त्वाच्या असलेल्या आणि ओझर ते शिर्डी या दोन विमानतळांना सिन्नर मतदारसंघातून वावी, देवकौठे, रांजणगाव मल्हारवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणाकामी सुमारे १०० कोटींचा निधी अपेक्षित आहे. या रस्त्याचे १० मीटर रुंदीकरण अथवा चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. यापैकी अडीच किलोमीटरकरता भूसंपादन आवश्यक असून, त्यासाठी दहा कोटींचा निधी लागणार आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग निधीतून या रस्त्यासाठी तरतूद करण्याची मागणी आमदार कोकाटे यांनी केली. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMLAआमदार