वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:44 IST2018-12-14T00:43:47+5:302018-12-14T00:44:45+5:30
पालखेड कालव्यास सध्या आवर्तन सुरू आहे. गेल्या वीस बावीस दिवसांपासून या भागात फक्त दोन तासच वीजपुरवठा केला जात होता; मात्र शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने वीज वितरण कंपनीने परिसरातील शेतकºयांसाठी आठ तास वीजपुरवठा सुरू केला होता; मात्र बुधवारपासून कुठलीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
पाटोदा : पालखेड कालव्यास सध्या आवर्तन सुरू आहे. गेल्या वीस बावीस दिवसांपासून या भागात फक्त दोन तासच वीजपुरवठा केला जात होता; मात्र शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने वीज वितरण कंपनीने परिसरातील शेतकºयांसाठी आठ तास वीजपुरवठा सुरू केला होता; मात्र बुधवारपासून कुठलीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
फक्त दोन तास वीजपुरवठा सुरू असल्यामुळे शेतकरी वर्गाला आपल्या पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिसरासाठी त्वरित आठ तास अखंडित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी येथील शेतकºयांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता गणेश चौधरी यांना निवेदन देऊन केली आहे.