सातवा वेतन आयोगाचा फरक देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST2021-09-19T04:15:39+5:302021-09-19T04:15:39+5:30

गेल्या १५ ऑगस्टपर्यंत ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. त्यास तीन ...

Demand for differentiation of the Seventh Pay Commission | सातवा वेतन आयोगाचा फरक देण्याची मागणी

सातवा वेतन आयोगाचा फरक देण्याची मागणी

गेल्या १५ ऑगस्टपर्यंत ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. त्यास तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे; मात्र यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची निघणारी रक्कम देण्यासंबंधीअद्याप निश्चित निर्णय नसल्याने त्यापोटी प्रत्येकी कायम कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना पन्नास हजार रुपये ॲडव्हान्स दिवाळीपूर्वी देण्यात यावा, तसेच १ जानेवारी २०१६ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदानाची रजा रोखीकरणाची रक्कम सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात आली आहे. ती सातव्या वेतन आयोगाप्रमाणे दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशी मागणी विकास यशोद, मनोहर आहिरे, रमेश खेडकर, संतोष ठाकरे, वाल्मिक सोनवणे, मधु सपकाळे, श्याम खेडकर, प्रताप पवार आदींनी केली आहे.

Web Title: Demand for differentiation of the Seventh Pay Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.