शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

निफाड तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 2:41 PM

ओझर: निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या करंजगाव, शिंगवे, म्हाळसाकोरे, भुसे परिसरासह उगांव-शिवडी, खेडे, वनसगांव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी, नैताळे, रामपुर, कोळवाडी, शिवरे या गावांत विजांच्या कडकडाटासह पावसाने शेतमालाचे नुकसान झाले आहे.

ओझर: निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या करंजगाव, शिंगवे, म्हाळसाकोरे, भुसे परिसरासह उगांव-शिवडी, खेडे, वनसगांव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी, नैताळे, रामपुर, कोळवाडी, शिवरे या गावांत विजांच्या कडकडाटासह पावसाने शेतमालाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील द्राक्ष बागांसह इतर पिकांचे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार अनिल कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी निफाड तालुक्यात सुमारे सव्वा तासाहुन अधिक काळ पावसाचा जोर होता. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. सद्यस्थितीत द्राक्षबागांच्या छाटणीनंतर द्राक्षबागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत सतत पाऊस होत असल्याने द्राक्षबागेच्या पानांवर व घडांवर करपा डावणी यासारखे रोग बळावत आहेत. तसेच फुलोर्यातील द्राक्षमण्यांची गळ अन घडकुज या पाऊसाने होत आहे. दररोज हजार दोन हजाररूपयांच्या रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करायची अन पुन्हा पाऊसाने त्यावर पाणी फेरायचे हे नित्याचे झाले आहे. महिनाभरापासुन सतत पावसाच्या आणि ढगाळ वातावरणामुळे सुर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागांत असलेल्या मुळ्या बंद पडत आहे. त्याचा परिणाम थेट ओलांड्यावर फांदीला मुळ्या फुटत आहे. नविन द्राक्षमाल जिरण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे तातडीने पंचनामे करावे, अशी मागणीही कदम यांनी केले आहे.द्राक्ष उत्पादक शेतकºयांबरोबरच सोयाबीन, मका, ऊस, भाजीपाला उत्पादक शेतकर्यांचेही भरपूर नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले आहे. त्यामुळे सर्वच पिकांचे पंचनामे करून शेतकºयांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी कदम यांनी निवेदनात केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक