पीक कर्ज उपलब्ध करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:31 IST2020-06-26T22:24:35+5:302020-06-27T01:31:24+5:30

शेतकरी बांधवांना राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून खरीप हंगामाकरिता पीककर्ज उपलब्ध करून द्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी. ए. कापसे यांना दिले.

Demand for crop loans | पीक कर्ज उपलब्ध करण्याची मागणी

भाजपच्या वतीने तहसीलदार बी.ए. कापसे यांना मागण्यांचे निवेदन देताना दीपक खैरनार, डॉ. अनिल महाजन, विश्वास पाटील, निंबा पगार, विकास देशमुख, गोविंद कोठावदे आदी.

ठळक मुद्देकळवण : तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

कळवण : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी करावी व शेतकरी बांधवांना राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून खरीप हंगामाकरिता पीककर्ज उपलब्ध करून द्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी. ए. कापसे यांना दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकरी बांधवांना राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून खरीप हंगामाकरिता पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रु पयांचा हप्ता मिळावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. मागण्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी अन्यथा शेतकºयांसाठी आंदोलन छेडले असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी भाजपचे सरचिटणीस डॉ. अनिल महाजन, विश्वास पाटील, शहराध्यक्ष निंबा पगार, विकास देशमुख, गोविंद कोठावदे यांच्यासह काशीनाथ गुंजाळ, एस.के. पगार, हितेंद्र पगार, काकाजी जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.