पिंपळगाव टोल नाक्यावरील अनधिकृत दुकाने बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 15:25 IST2020-12-24T15:22:31+5:302020-12-24T15:25:54+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील पीएनजी टोल परिसरात असलेल्या अनधिकृत दुकानांमुळे गुन्हेगारी व अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सदर दुकाने बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निफाड तालुकाध्यक्ष महेंद्र साळवे यांनी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे व पीएनजी टोल व्यवस्थापक नवनाथ केदारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपळगाव टोल नाक्यावरील अनधिकृत दुकाने बंद करण्याची मागणी
पिंपळगाव बसवंत शहर मोठी बाजारपेठ आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असल्याने या शहराला अजूनच महत्त्व प्राप्त झाले आहे. द्राक्ष, टोमॅटो, कांद्यासह इतर शेतमालाची बाजारपेठ असल्याने परराज्यातूनही व्यापारी, कामगारांचा राबता असतो. महामार्गावरील पीएनजी टोल नाक्यावरील अनधिकृत दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीबरोबरच अपघातदेखील वाढू लागले आहेत. सदर प्रकार रोखण्यासाठी अनधिकृत दुकाने तातडीने बंद करण्याची मागणी रिपाइंतर्फे करण्यात आली आहे. यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, जिल्हा संघटक भारत गांगुर्डे, विकार शेख, सचिन गांगुर्डे, अशोक गांगुर्डे व अशोक पठारे आदी उपस्थित होते.