भारनियमन रद्दची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:11 IST2018-10-18T23:05:16+5:302018-10-19T00:11:26+5:30
सध्याची दुष्काळी परिस्थिती व सणांचे दिवस असताना महावितरणने वाढवलेले भारनियमन कमी करावे, अशी मागणी राष्टÑवादी युवक कॉँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.

महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांना निवेदन देताना राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे पदाधिकारी.
नाशिकरोड : सध्याची दुष्काळी परिस्थिती व सणांचे दिवस असताना महावितरणने वाढवलेले भारनियमन कमी करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
राष्टÑवादी युवक कॉँग्रेस पार्टीच्या वतीने मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या दुष्काळी परिस्थिती व दसरा, दिवाळी सणाचे दिवस आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा कालावधी सुरू झाला आहे. दरम्यान महावितरणकडून भारनियमन कालावधी वाढविल्याने सर्वांची गैरसोय होत आहे. सणासुदीचे दिवस व परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन वाढविलेले भारनियमन त्वरित कमी करून जास्त वेळ वीज उपलब्ध
करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर चंदू साडे, गणेश गायधनी, सुनील कोथमिरे, योगेश निसाळ, कुंदन ढिकले, प्रसाद ढिकले, जयप्रकाश गायकवाड, गणेश गायधनी आदींच्या सह्या आहेत.