कालवा कामाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:08 IST2018-03-10T00:08:20+5:302018-03-10T00:08:20+5:30
कळवण : तालुक्यातील पुनंद (अर्जुनसागर) प्रकल्प अंतर्गत येणाºया सुळे उजवा कालव्याचे १ ते २१ किलोमीटरचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षं झाले तरी अद्यापपावेतो या कालव्यातून पाणी आले नाही आणि शेतकरी बांधवांपर्यंत पोहचू शकलेले नाही.

कालवा कामाच्या चौकशीची मागणी
कळवण : तालुक्यातील पुनंद (अर्जुनसागर) प्रकल्प अंतर्गत येणाºया सुळे उजवा कालव्याचे १ ते २१ किलोमीटरचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षं झाले तरी अद्यापपावेतो या कालव्यातून पाणी आले नाही आणि शेतकरी बांधवांपर्यंत पोहचू शकलेले नाही. तत्कालीन अधिकारी यांनी मनमानी कारभार केल्यामुळे परिसरातील जनता पाण्यापासून वंचित राहिली आहे. या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेने करून पुनंद डावा कालवा उपविभागाचे सहायक अभियंता एन. डी. बाविस्कर यांच्याकडे करण्यात आली आहे.