भूमिहीनांना शेतजमिनीचा लाभ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:38 IST2018-05-01T00:38:49+5:302018-05-01T00:38:49+5:30
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेंतर्गत प्रत्येक चार एकर शेतजमीन मिळविण्यासाठी ३२ भूमिहीनांनी अर्ज केले असून, त्यांना शेतजमिनीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी पंचशील अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

भूमिहीनांना शेतजमिनीचा लाभ देण्याची मागणी
नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेंतर्गत प्रत्येक चार एकर शेतजमीन मिळविण्यासाठी ३२ भूमिहीनांनी अर्ज केले असून, त्यांना शेतजमिनीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी पंचशील अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. फुले, शाहू, आंबेडकर, कांशीराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पंचशील अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या अडीच वर्षांपासून दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांनी शेतजमीन मिळविण्यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार समाजकल्याण विभागाने भीमराव जाधव यांना पत्र देऊन कळविले होते. त्यानुसार भीमराव जाधव यांनी ३१ भूमिहीन साथीदारांसह शेतजमीन लाभासाठी अर्ज केला. तसेच १२६ एकर शेतजमीन विकणाºयांचीही माहिती दिली. त्यामुळे सर्व एकूण ३१ लाभार्थींना १२६ एकर जमीन प्रत्येक ४ एकरप्रमाणे मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी सदर निवेदनावर करण्यात आली असून निवेदनावर त्र्यंबक जाधव, उत्तम जाधव, पंचशीला जाधव, सिद्धार्थ काळे, राहुल वाकळे, भगवान गायकवाड आदींच्या स्वाक्षºया आहेत.