Demand for arrest of Dabholkar murder suspect | दाभोळकर खुनातील सूत्रधारांना अटकेची मागणी
दाभोळकर खुनातील सूत्रधारांना अटकेची मागणी

नाशिक : शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून होऊन अनेक वर्ष उलटली तरी अजून त्यांचे सूत्रधार मोकाट आहे. त्यामुळे त्यांच्या सूत्रधारांना अटक व्हावी म्हणून गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक सुशीलकुमार इंदवे, जिल्हा सचिव अ‍ॅड. समीर शिंदे, जिल्हा बुवाबाजी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे, नाशिक शहर कार्याध्यक्ष प्रल्हाद मिस्त्री, शहर प्रधान सचिव नितीन बागुल आदी उपस्थित होते.

Web Title:  Demand for arrest of Dabholkar murder suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.