विनापरवानगीचे गतिरोधक हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:33 AM2018-05-13T00:33:25+5:302018-05-13T00:33:25+5:30

रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची (आरटीए) परवानगी असल्याशिवाय, यापुढे शहरात गतिरोधक न टाकण्याचे धोरण महापालिकेत स्थापन झालेल्या अर्बन मोबिलिटी सेलच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. अस्तित्वातील गतिरोधक आयआरएस प्रमाणानुसार नसल्यास आणि रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची परवानगी नसल्यास ते हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

Deletion of unnecessary impedance | विनापरवानगीचे गतिरोधक हटविणार

विनापरवानगीचे गतिरोधक हटविणार

googlenewsNext

नाशिक : रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची (आरटीए) परवानगी असल्याशिवाय, यापुढे शहरात गतिरोधक न टाकण्याचे धोरण महापालिकेत स्थापन झालेल्या अर्बन मोबिलिटी सेलच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. अस्तित्वातील गतिरोधक आयआरएस प्रमाणानुसार नसल्यास आणि रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची परवानगी नसल्यास ते हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.  आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पायी चालणे व सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, मनपा स्तरावर शहर बस वाहतुकीचे व्यवस्थापन करणे, ठराविक मार्गांना एकेरी अथवा दुहेरी वाहतुकीत बदल करणे, विविध चौकांतील सिग्नल यंत्रणा व पादचाऱ्यांना सिग्नल यंत्रणा उभारणे, गतिरोधकांबाबत धोरण ठरविणे, विविध चौकांचे सुशोभिकरण आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी शहर वाहतूक पोलीस शाखेने रस्त्यावर व फुटपाथवर पार्किंग करणाºया वाहनधारकांवर कारवाई करावी, अधिकृत रिक्षा थांबे निश्चित करून त्यात रिक्षांची संख्या निश्चित करावी, द्वारका चौफुलीवरील अवैध थांबे रोखावेत, शहरात आवश्यकतेनुसार नो व्हेईकल झोन निर्माण करावेत, निवडक रस्त्यांवर एकेरी वाहतूक करावी, आदि आदेश दिले.
बससेवा लवकरच
मंगल कार्यालये-लॉन्स समोरील अनधिकृत पार्किंगवर सक्तीने कारवाई करण्याचेही आदेश दिले. बॅरिअर फ्री व वापरास अनुकूल पादचारी मार्ग निर्माण करण्याचे काम लवकर हाती घेण्याचे प्रस्तावित असून, शहर बससेवाही कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: Deletion of unnecessary impedance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.