शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

मालेगावच्या प्रश्नांबाबत मुंबईत शिष्टमंडळाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:19 PM

राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईत कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मालेगाव जिल्हानिर्मितीसह विविध प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

ठळक मुद्देसाकडे : जिल्हानिर्मितीसह मांजरपाडा पाणीप्रश्नासंदर्भात कॉँग्रेसचे निवेदन

मालेगाव : राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईत कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मालेगाव जिल्हानिर्मितीसह विविध प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात संगमनेर येथे राज्याचे महसूलमंत्री काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मालेगाव जिल्हानिर्मितीसाठी भेट घेतली होती. मालेगाव जिल्हानिर्मितीची पहिली मागणी माजीमंत्री डॉ. बळीराम हिरे यांनी १९८० साली केली होती. या मागणीला तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांच्याबरोबर शरद पवार यांचेसह आजपर्यंत झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र प्रत्यक्षात मालेगाव जिल्हानिर्मिती होऊ शकली नाही. आजमितीला मालेगाव येथे जिल्हास्तरीय सर्वच शासकीय कार्यालये अस्तित्वात आहेत. नवीन जिल्हानिर्मितीसाठी राज्य सरकारला जास्त भार पडणार नाही, याकडे शिष्टमंडळाने मंत्रिमहोदयांचे लक्ष वेधले. महसूल प्रशासनाच्या दृष्टीने कामकाजासाठी अवाढव्य बनलेल्या नाशिक जिल्ह्याचे विभाजन होणे ही प्रशासकीय आणि आता काळाचीही गरज असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. यावर, मालेगाव जिल्हानिर्मितीसाठी आपण निश्चित पुढाकार घेऊ, असे आश्वासन शरद पवार, पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिले. यावेळी कसमादेच्या प्रलंबित सिंचन प्रकल्प आणि पाणीप्रश्नांकडेही शिष्टमंडळाने त्यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला जाता कामा नये, यासाठी शेतकऱ्यांचा गेल्या काही वर्षांपासून लढा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात उगम पावणाºया नार-पार, अंबिका-औरंगा, ताण-माण यासारख्या जवळपास २८ नद्या पश्चिम वाहिन्या आहेत. या नद्यांचे ५० टीएमसी पेक्षा जास्त पाणी समुद्रात वाहून जाते. हे पाणी प्रवाही वळण पध्दतीने पूर्व वाहिनी करून तापी खोºयातील गिरणा नदीत टाकल्यास मालेगावसह कळवण, देवळा, नांदगाव, चांदवडसह जळगाव जिल्हयाचा शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा व उद्योगाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामुळे हे प्रलंबित प्रकल्प त्वरित मार्गी लावावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात प्रसाद हिरे, दशरथ निकम, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर, केवळ हिरे, बाजीराव निकम, प्रांतिक काँग्रेसचे सचिव चंद्रकांत गवळी, रामराव शेवाळे, टीडीएफचे जिल्हाध्यक्ष आर. डी. निकम , तालुकाध्यक्ष अनिल अहिरे, नितीन हिरे, त्र्यंबक मार्तंड, राजेंद्र शेळके आदींसह परिसरातील पदाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात सहभाग होता. अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकपदाच्या नियुक्तीसाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी ) रद्द करावी, टीईटी परीक्षा व पवित्र पोर्टल या दोन्ही योजना तत्काळ बंद कराव्यात, शिक्षक व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वीस टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान द्यावे, शिक्षकांना वीस वर्षांनंतर सरसकट निवडश्रेणी दिली जावी.

टॅग्स :congressकाँग्रेसMalegaonमालेगांव