ठोंबरे शिक्षक पतसंस्था अध्यक्षपदी दीपक थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:15 IST2021-09-24T04:15:48+5:302021-09-24T04:15:48+5:30
संस्थेचे अध्यक्ष सुनील गीते आणि उपाध्यक्ष जालिंदर गावडे यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या जागा रिक्त झाल्या होत्या. ...

ठोंबरे शिक्षक पतसंस्था अध्यक्षपदी दीपक थोरात
संस्थेचे अध्यक्ष सुनील गीते आणि उपाध्यक्ष जालिंदर गावडे यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या जागा रिक्त झाल्या होत्या. अध्यक्षपदासाठी थोरात यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी शेवाळे यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सहकार अधिकारी रवींद्र जाधव यांनी थोरात व शेवाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे व्यवस्थापक दत्तात्रय भोरकडे यांनी कामकाज पाहिले.
सभेला संचालक सुनील गीते, जालिंदर गावडे, दादासाहेब बोराडे, जनार्दन सोनवणे, भाऊसाहेब साळी, रतन पिंगट, शिरीष सूर्यवंशी, मनीषा पाटील, भारत कानडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
----------------------
येवला येथील स्व. शशिकांत ठोंबरे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक थोरात व उपाध्यक्ष संगीता शेवाळे यांचा सत्कार करताना संचालक मंडळ. (२३ येवला शिक्षक)
230921\23nsk_7_23092021_13.jpg
२३ येवला शिक्षक