त्र्यंबकच्या उपनगराध्यक्षपदी दीपक गीते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 14:39 IST2020-01-18T14:39:03+5:302020-01-18T14:39:37+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दीपक पांडुरंग गीते (लोणारी) यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी तथा नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी शनिवारी जाहीर केले.

त्र्यंबकच्या उपनगराध्यक्षपदी दीपक गीते
त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दीपक पांडुरंग गीते (लोणारी) यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी तथा नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी शनिवारी जाहीर केले. उपनगराध्यक्षपदासाठी गीते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज वेळेत दाखल करण्यात आला होता. तरीही नियमानुसार १५ मिनिटे माघार घेण्यासाठी असल्याने व एकमेव अर्ज असल्याने निवडणुक निर्णय अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी निर्णय घोषित केला. उपनगराध्यक्ष कैलास चोथे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त होती. गीते यांचे सभागृहातून बाहेर आगमन झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा काढण्यात आली. गीते यांच्या घराण्याला राजकारणाचा वारसा असुन त्यांचे आजोबा दामोदर उर्फ दामुअण्णा लोणारी हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी नगरपरिषदेचे १० ते १५ वर्षे नगराध्यक्ष काँग्रेसचे व निष्ठावंत पदाधिकारी होते. त्यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव पांडुरंग तथा बाबासाहेब लोणारी यांनीही नगराध्यक्षपद भुषिवले आहे. गीते यांच्यारूपाने तिसरी पिढी भाजपच्या तिकीटावर विजयी झाले आहे.