नाशिक : कोरोनाबधित रुग्णाला ऑक्सिजन सिलिंडर लावून थेट राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारावर आणून आंदोलन करणारा कार्यकर्ता दीपक डोके यास सरकारवाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. कोरोनाबधित रुग्णाला सार्वजनिक ठिकाणी आणत कोरोना संसर्ग फैलावाचा धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. त्याच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. डोके याने गेल्या बुधवारी (दि.३१) रोजी सायंकाळी एका कोरोनाबधित रुग्णाला मुख्यालयात आणून आंदोलन केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित रुग्णाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
दीपक डोकेला पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:14 IST