शेतात अचानक आढळला खोल खड्डा, गुढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:50 PM2017-12-29T12:50:37+5:302017-12-29T12:51:05+5:30

नांदगांव- तालुक्यातील कासारी येथील नाना करनर यांच्या कांदा लागवड केलेल्या शेतात पाणी भरतांना अचानक खोल खड्डा आढळल्याने एकच खळबळ उडाली.

A deep pit found suddenly in the field, remained intact | शेतात अचानक आढळला खोल खड्डा, गुढ कायम

शेतात अचानक आढळला खोल खड्डा, गुढ कायम

googlenewsNext

नांदगांव- तालुक्यातील कासारी येथील नाना करनर यांच्या कांदा लागवड केलेल्या शेतात पाणी भरतांना अचानक खोल खड्डा आढळल्याने एकच खळबळ उडाली. शेतात रात्रीच्या वेळेला बबन इपर हे पाणी भरत असतांना पाणी सोडलेल्या दांडाला पाणी का येत नाही म्हणून ते दांडाने चालत गेले. तेथे त्यांना एका खड्यात पाणी झिरपत असल्याचे दिसले. सुरु वातीला लहान वाटणाºया खड्यात त्यांनी दगड माती भरली. मात्र बॅटरीच्या उजेडात तो खड्डा सुमारे दोन ते अडीच फुट व्यासाचा व दहा फुट खोल असल्याचे लक्षात येताच पाणी भरणारा बबन तेथून घरी निघून आला. सकाळी काही ग्रामस्थ शेतावर बोगदा बघण्यासाठी गेले असता त्याची खोली जास्त वाटल्याने त्यात कोणी उतरण्याची हिंमत केली नाही. दरम्यान पोलीस पाटील प्रभाकर शिंगाडे यांनी घटनेची माहिती पोलिसात दिली. शेतावर कांतीलाल इपर, रमेश राठोड, तलाठी जयश मंडुडे, हे गेले. अचानक पडलेल्या या खड्याचे गूढ कायम असून त्याविषयी उलटसुलट चर्चा सुरु आहे.

Web Title: A deep pit found suddenly in the field, remained intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक