दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 00:53 IST2021-05-06T22:20:22+5:302021-05-07T00:53:11+5:30

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यात कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती पाहता रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत होती. रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने रुग्णवाहिकांसाठी रुग्णांच्या कुटुंबाला देखिल पळापळ करावी लागत असल्याने सारेच हतबल झाले होते. हे लक्षात येताच माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी स्वखर्चातून गुरुवारी इगतपुरी तालुक्यासाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले.

Dedication of two ambulances | दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

ठळक मुद्देइगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते ह्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यात कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती पाहता रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत होती. रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने रुग्णवाहिकांसाठी रुग्णांच्या कुटुंबाला देखिल पळापळ करावी लागत असल्याने सारेच हतबल झाले होते. हे लक्षात येताच माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी स्वखर्चातून गुरुवारी इगतपुरी तालुक्यासाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले.

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते ह्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी प्रसंगी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसीम सय्यद, महेश शिरोळे, कोविड मदत कक्षाचे संस्थापक माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, घोटी ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, खरेदी विक्री संघाचे संचालक शरद हांडे, भास्कर सोनवणे आदी उपस्थित होते. कोरोना संक्रमण वाढत असल्याने आतापर्यंत गोरख बोडके यांनी ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर यंत्र, ऑक्सिजन सिलेंडर, बेड, ऑक्सिजन, विविध इंजेक्शन आदी मदत केली आहे. रुग्णवाहिका लागल्यास कोविड १९ मदत कक्ष ग्रामीण तालुका : हरिश्चंद्र चव्हाण, भास्कर सोनवणे, घोटी शहर : श्रीकांत काळे, समाधान जाधव, इगतपुरी शहर : किरण फलटणकर, वसीम सय्यद ह्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Web Title: Dedication of two ambulances