सामाजिक बांधिलकीतून शाळा प्रवेशद्वाराचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:44 IST2020-11-20T21:21:07+5:302020-11-21T00:44:35+5:30

उमराणे : सामाजिक बांधिलकीतून दहिवड (ता.देवळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन प्रवेशद्वाराचे व शाळेतील जलकुंभांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Dedication of school entrance through social commitment | सामाजिक बांधिलकीतून शाळा प्रवेशद्वाराचे लोकार्पण

सामाजिक बांधिलकीतून शाळा प्रवेशद्वाराचे लोकार्पण

उमराणे : सामाजिक बांधिलकीतून दहिवड (ता.देवळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन प्रवेशद्वाराचे व शाळेतील जलकुंभांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते कैलास देवरे व दहिवड येथील वाल्मीक सोनवणे यांनी प्रवेशद्वार व जलकुंभ उभारून सामाजिक बांधिलकी जपत इतरांसमोर आदर्श ठेवला असल्याचे मत दहिवडचे सरपंच आदिनाथ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोतातून व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे दत्तू बोडके, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, रमेश रामदास देवरे, उपसरपंच मनेश ब्राह्मणकर, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, माजी जि. प. सदस्य प्रशांत देवरे, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे, शिवसेनेचे देवळा तालुकाप्रमुख सुनील पवार, उपतालुुकाप्रमुख भरत देवरे, प्रहारचे संजय देवरे, कृष्णा जाधव, नानाजी अहेर, भाऊसाहेब मोरे, दशरथ पुरकर, बापू देवरे, मधुकर शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक सावंत, वैद्यकीय अधिकारी सचिन वैद्य, गणेश देवरे, शिवसेनेचे दीपक देवरे, दिनेश देवरे, बंटी देवरे आदींसह बहुतांशी नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय देवरे यांनी केले.

-----------------------

अत्यंत हालकीच्या परिस्थितीत शिक्षण घेताना आलेल्या अडचणी बघता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी प्रवेशद्वार उभारणीसाठी मदत केली.
- कैलास देवरे, युवा उद्योजक

Web Title: Dedication of school entrance through social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक