एम्पथी फाउंडेशनकडून शाळेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:17 IST2021-02-02T20:51:41+5:302021-02-03T00:17:33+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिकाडी या अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर मुंबईच्या एम्पथी फाउंडेशनने बांधलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन शालेय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

एम्पथी फाउंडेशनकडून शाळेचे लोकार्पण
गावाचा विकास साधायचा असेल तर गावखेड्यातील शाळा या विकासाचा मूळ स्रोत असून प्राथमिक शिक्षक हा या विकासाचा मूळ गाभा आहे, असे उद्गार फाउंडेशनचे सल्लागार यशवंत सोहनी यांनी काढले. याच सोहळ्यात फाउंडेशनचे सुरेश भवर, गटशिक्षण अधिकारी भास्कर कनोज यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक बैरागी व शिक्षक दत्तात्रय अलगट यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सचिन चौधरी, दिनेश झोरी, प्रवीण पटेल, सुनीता अहिरे, नामदेव गायकवाड, सरपंच मीराबाई भोये, उपसरपंच रामचंद्र गुंबाडे, एकनाथ भोये, यादव भोये, पोलीस पाटील जयराम भोये, अंबादास गावित, वनारवाडी सरपंच दत्तू भेरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी तर आभार अरुण इंगळे यांनी मानले.