एरंडगाव येथे खुल्या जीमचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 02:15 IST2021-03-22T21:21:29+5:302021-03-23T02:15:49+5:30

येवला : तालुक्यातील एरंडगाव येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जीमचे लोकार्पण पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

Dedication of open gym at Erandgaon | एरंडगाव येथे खुल्या जीमचे लोकार्पण

एरंडगाव येथे खुल्या जीमचे लोकार्पण

येवला : तालुक्यातील एरंडगाव येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जीमचे लोकार्पण पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. एरंडगाव खुर्द ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोग निधीतून खुली जीम उभारली आहे. यावेळी शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर चार लाभार्थी ज्ञानेश्वर मोरे, चंद्रभान मोरे, गोरख माळी, दादा पवार यांना मंजुरी आदेश सभापती गायकवाड यांचे हस्ते वितरीत करण्यात आले. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने सभापती गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. गावातील अंगणवाडी केंद्राला सभापती गायकवाड यांनी भेट देऊन पोषण आहार पुरवठा व इतर कामकाजाची माहिती घेऊन कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी माजी सरपंच कचरू उराडे, काका पडोळ, उत्तम पडोळ, बबन घोरपडे, खंडू बहिरम, योगेश उराडे, दिलीप मोरे, कविता पडोळ, रत्ना गोराडे, शोभा उराडे, पिनू मोरे, साहेबराव उराडे, नितीन दुकळे आदी उपस्थित होते.

Web Title: Dedication of open gym at Erandgaon

टॅग्स :Nashikनाशिक