चिचोंडी खुर्दला शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:44 IST2021-03-02T21:45:11+5:302021-03-03T00:44:40+5:30
जळगाव नेऊर : चिचोंडी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये चौदाव्या वित्त आयोगातून विविध शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.

चिचोंडी खुर्द जिल्हा परिषद शाळेला १४ व्या वित्त आयोगातून प्रोजेक्टर कॉम्प्युटर भेट देताना मनीषा मढवई, साईनाथ मढवई व ग्रामस्थ.
जळगाव नेऊर : चिचोंडी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये चौदाव्या वित्त आयोगातून विविध शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
ग्रामपंचायत चिचोंडी खुर्दकडून शाळेला १४ वा वित्त आयोगातून देण्यात आलेल्या प्रोजेक्टर,कॉम्प्युटर सेट तसेच इन्ट्रॅकटीव्ह स्क्रीन टच व्हाइट बोर्ड, तार कंपाउंड या साहित्याचे लोकार्पण येथील सरपंच मनीषा संतोष मढवई यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संतोष मढवई, संतोष मेथे, पुंडलिक मढवई, किसन मढवई, बाळासाहेब कोकाटे, नारायण मढवाई, दीपक मढवाई, काका पैठणकर, वाल्मिक राजगुरु, सुखदेव रोडे, संजय मढवाई, ग्रामसेवक बी. बी. गायके उपस्थित होते. प्रभारी मुख्याध्यापक रावसाहेब येवले, पवार, कदम,आवरी आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.